padsavalya.jpg

बहिणाबाई चौधरी यांच्या नंतरची कविता लिहिणाऱ्या कवयित्री म्हणजे प्रतिभा खैरनार- ऐश्वर्य पाटेकर

कवियत्री लेखिका प्रतिभा खैरनार यांच्या पडसावल्या या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पुस्तकांची माय म्हणून सर्वदूर परिचित असणाऱ्या भिमाबाई जोंधळे आजींच्या शुभहस्ते नुकताच काल नाशिक येथील सुप्रख्यात आजीबाईंचे पुस्तकांचे हॉटेल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व सुप्रसिद्ध कवी ऐश्वर्य पाटेकर बोलत होते, पाटेकर म्हणाले की कवयित्री प्रतिभा खैरनार अतिशय दर्जेदार व सकस ग्रामीण कविता लिहिणाऱ्या कवयित्री असून त्यांचा बाभूळ फुल हा सद्या गाजत असणारा कथासंग्रह आला तेव्हाच मला जाणवले होते की या कथासंग्रह नंतर त्या उत्तम कविता मराठी साहित्याला देणार आहेत आणि आज पडसावल्यांच्या निमित्ताने मराठी साहित्य क्षेत्रात एका दर्जेदार पुस्तकाची भर पडली त्यांची लिहिण्याची एक स्वतंत्र शैली असून आद्य कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नंतर कवितेचा वारसा आपल्या हाती घेण्याचं काम प्रतिभा खैरनार या करत आहे व हा कवितासंग्रह रसिकांच्या मनावरती गारुड घालणारा असून मराठी साहित्य क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले,प्रमुख उपस्थिती म्हणून आई प्रतिष्ठान मालेगाव चे अध्यक्ष कवी राजेंद्र दिघे, चांदवडी रुपयाचे रावसाहेब जाधव, कवी सागर जाधव व व्याख्याते कवी अमोल चिने,कवी सप्तश्री माळी, अक्षरबंध प्रकाशनचे संपादक प्रवीण जोंधळे, कवी सौरभ आहेर,कवी कुणाल शिरोडे, कवियत्री सौ.प्रतिभा खैरनार,सुरेश खैरनार व खैरनार कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे मनोगत पर भाषणे झाली सप्तश्री माळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रवीण जोंधळे यांनी आभार मानले.